कृषी उत्पन्न बाजार समिती,चाळीसगाव
आजचे बाजारभाव

कृषी उत्पन्न बाजार समिती,चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व.जिभाऊसो रामराव दगडू पाटील यांनी दिनांक २ मार्च १९४५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली.

औरंगाबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग लगत १५ एकर क्षेत्रात ती कार्यान्वित झाली तसेच दीर्घ काळ प्रतिनिधित्व करत भौगोलिक सुविधा निर्माण केल्या. मा.आ.स्व.मोतीरामभाऊ पाटील, मा.आ.स्व.राजारामभाऊ पाटील, मा.केंद्रीय मंत्री स्व.सोनुसिंगआण्णा पाटील या दिग्गजांनी देखील बाजार समितीत प्रतिनिधित्व केले.

सहकार महर्षी आण्णासो स्व.उदेसिंग रामसिंग पवार यांनी दीर्घकाळ नेतृत्व करत काटकसरीने व शेतकरी केंद्रबिंदू मानत उल्लेखनीय कार्य केले, त्यांना स्व. लोकनेते अनिल दादा देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तद्नंतर विविध राजकीय पक्षांच्या सहकारातील प्रतिनिधींनी बाजार समितीची धुरा सांभाळली.
सद्यस्थितीत सहकार नेते प्रदीप दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनात कामकाज सुरू आहे.

महाराष्ट्रात नावलौकिक असलेला शनिवारचा बैलबाजार येथील वैशिष्ट्य आहे तसेच केळी लिंबू व कांदा यासाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, तूर, मूग, सोयाबीन, हरभरा या परिसरातील मुख्य पीक असून याची आवक सातत्याने बाजार समितीच्या आवारात होत असते.

शेतकरी बांधवांसाठी विविध सुविधांसह सज्ज असलेले बाजार समितीच्या आवारात प्रामुख्याने भव्य सेल हॉल, शेतकरी निवास, पे-ऑफिस बँक, कॅन्टीन, रसवंती, पिण्याचे आर ओ वॉटर, E-Nam बाजार, २ भुई काटे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, इ.बाजार सुविधा तसेच शेतकऱ्यांना इतर माहितीसाठी  बंतोष ॲपद्वारे माहिती पुरवली जाते.

तसेच शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी बाजार समिती आवारात लवकरचपेट्रोल पंप कार्यान्वित होत असून E-Nam लिलाव सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी केंद्रबिंदू मानत व्यापारी, हमाल, मापाडी व कर्मचारी या सर्वांचा समन्वय साधून महाराष्ट्रात चाळीसगाव बाजार समिती लवकरच नावलौकिकास येईल अशी शास्वती सभापती व संचालक मंडळ देत आहे.